वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

कासया प्रतिष्ठा व्यर

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074467 · अभंग क्र. ५५३

553.
कासया प्रतिष्ठा व्यर्थ मानितोसी ।
सर्वत्र धरिसी समभावे ॥१॥
आत्मयासी जगती अवघाची एकला ।
जगांत संचला तद्रूपे तो ॥२॥
अणुरेणु तृण काष्ठादि पाषाण ।
सर्वत्री समान आत्मा तोचि ॥३॥
देह उच्च नीच आत्मा सर्व सम ।
मानिती विषम मंदमती ॥४॥
भेदाभेद दोन्ही सर्व एकाकार ।
म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण योगी ॥५॥

अर्थ :
सर्व ठिकाणी माझा समभाव आहे. अशी प्रतिष्ठा लोकांमध्ये विनाकारण कशाला मिरवितोस. त्या ऐवजी जर सर्वव्यापक एक ब्रह्म आहे. असे जर जाणशील तर जगव्यापक परमात्माशी तू एकरुप होशील. परमात्मा अणु, रेणु, तृण, काष्ठ, पाषाण या सर्व ठिकाणी समान भरलेला आहे. तेच तुझेही स्वरुप आहे. उंच नीचपणा आत्म्याचा नसून देहादि उपाधिचा आहे. पण मंदमती लोक ती विषमता आत्म्याची मानतात. जगातील भेदाभेद हे सर्व एक ब्रह्मरुपच आहेत. असे जाणणारा तो पूर्ण योगी समजावा. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग