वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १, अद्वैत अभंग ४७५ ते ५६४

आमुचिया देवा नाही ना

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074402 · अभंग क्र. ५५२

552.
आमुचिया देवा नाही नाम गुण ।
नाही स्थानमान रुपरेखा ॥१॥
नित्य निराकारी आमचे भजन ।
अहंब्रह्म पूर्ण निजध्यासे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे आमिष जोडिले ।
निरंजनी केला वास आम्ही ॥३॥

अर्थ :
आमच्या देवाला नाम, गुण, स्थान, मान, रुप, रेषा काही नाही. तो नित्य व निराकार स्वरुप आहे. त्याचे भजन अह ब्रह्मास्मि अशा शब्दांनी आम्ही करतो. त्याची प्राप्ती निजध्यासाने होते. अह ब्रह्मास्मि असा निजध्यास हे एक त्याच्या प्राप्तीचे निमित्त आहे. त्या योगाने आम्ही ब्रह्मस्थितीला प्राप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग