वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ७, वासुदेव अभंग

कर जोडोनि विनवितो तु

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073075 · अभंग क्र. ६९

69.
कर जोडोनि विनवितो तुम्‍हा । नका गुंतू संसार श्रमा ।
नका गुंतू विषय कामा । तुम्‍ही आठवा मधुसूदना ॥१॥
तुम्‍ही वासुदेव वासुदेव म्‍हणा । तुम्‍ही वासुदेव वासुदेव म्‍हणा ॥धृ॥
नरदेह दुर्लभ जाणा । शत वर्षाची गणना ।
त्‍यामध्‍ये दु:ख यातना । तुम्‍ही आठवा मधुसुदना ॥३॥
नलगे तीर्थाचे प्रभण । नलगे दंडण मुंडण ।
नलगे पंचाग्‍नी साधन । तुम्‍ही आठवा मधुसूदन ॥४॥
हेचि माझी विनवणी । जोडितो कर दोन्‍ही ।
शरण एका जनार्दनी । तुम्‍ही वासुदेव म्‍हणा अनुदिनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग