वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

तापत्रयी तापली गुरुत

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072859 · अभंग क्र. ६९

69.
तापत्रयी तापली गुरुते गिवसिती । भगवे देखोनि म्हणती तारा स्वामी ।
तंव ते नेणोनि उपदेशाची रीती । आना न उपदेशिती ठकले निश्र्चिती तैसे जाले ॥१॥
संत ते कोण संत ते कोण । हे जाणवि खुण केशवराज ॥२॥
कोण्ही एक प्राणी क्षुधेने पिडिले । म्हणोनि दोडे तोंडू गेले ।
खावो बैसे तो नुसधि रुपी उडे । ठकले बापुडे तैसे झाले ॥३॥
कोण्ही एक प्राणी प्रवासे पीडिला । स्नेहाळु देखिला बिबवा तो ।
तयाचे स्नेहलाविता अंगी । सुजला सर्वांगी तैसे जाले ॥४॥
कोण्ही एक प्राणी पीडीला झडी । म्हणोनि गेला पैल तो झाडी ।
खा खात अस्वली उठली लवडसवडी । नाक कान तोडी तैसे झाले ॥५॥
ऐशा सकळ कळा जाणसी । नंदरायाचा कुमर म्हणविसी ।
बापरखुमादेविवर विठ्ठली भेटी । पडलि ते न सुटे जिवेसी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग