दृश्य आणि द्रष्टा दर
73.
दृश्य आणि द्रष्टा दर्शने समवेत ।
ब्रह्म सदोदित सर्वकाळ ॥१॥
काय घेऊ काय सांडू कोणीकडे ।
अनंत ब्रह्मांडे रोमरंध्री ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञप्ति ज्ञान ।
साध्य तो साधन आपण जाला ॥३॥
बहेणि म्हणे द्वैत स्वप्नामाजी नसे ।
अवघाची प्रकाशे राम माझा ॥४॥
