वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 47. नंद यशोदा संवाद

नंदयशोदा संवाद

🙏 4. संत नामदेव · ABH-083067 · अभंग क्र. ७२

72.
नंदयशोदा संवाद

नंदे सोडविले तेव्हा त्या कृष्णासी । नासू देगे याशी दही दूध ॥१॥
मजला लेंकरे नाहींत गे फार । विश्रांतीसी घर एवढे आहे ॥२॥
निवारिले विघ्न देवे हे केवढे । पडती जरी झाडे याजवरी ॥३॥
आजपासूनि यासी बोलसी कठीण । देईंन मी प्राण तुजवरी ॥४॥
स्फुंदस्फुंद रडे तेव्हा नारायण । देई यासी स्तन भुकेलासे ॥५॥
यशोदा बाहात नये वनमाळी । धांवोनि कुरवाळी वदन त्याचे ॥६॥
समजावोनि देवा पाजितसे स्तन । घालीत भोजन नामा ह्मणे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग