विमालार्जुनोद्धार
69.
विमालार्जुनोद्धार
कुबेराचे पुत्र मदोन्तत्त झाले । म्हणूनि शापिले नारदाने ॥१॥
व्हाल तुम्ही वृक्ष ऐकोनी सावध । झाला अपराध ऋषिराया ॥२॥
विमलार्जुन वृक्ष व्हाल गोकुळांत । उश्याप वदत कृपाळुवा ॥३॥
कृष्णाचा चरण लागेल तुम्हांसी । आपुल्या स्थळासी याल बेगी ॥४॥
मोडितसे वृक्ष लक्ष्मीचा पती । दोघे निघताती दिव्य पुरुष ॥५॥
नामा म्हणे तेव्हा करिताती स्तुती । पापे दग्ध होती ऐकतांची ॥६॥
