भक्ती भावा ठाव नाही
72.
भक्ती भावा ठाव नाही । कवित्व करी उभे घाई ॥
लोकाप्रती वाचितो पोथी पुराण । आपण भरले आडराने ॥
देखत देखत ठाकिती लोका । आपण घेती लोकाचा थुका ॥
हाती घेऊनी फिरवितो माळा । पन्नास घालुनी कापी गळा ॥
त्या चांडाळा मोक्ष नाही । ते पडती नर्कवाही ॥
अंतरी भेदाचे परी । जीव मारुनी पैसे वरी ।
बोधला म्हणे ऐस्या केवी मती होती । पुर्वजासहित नरकी जाती ॥
