वासुदेव स्मरण पापहर
70.
वासुदेव स्मरण पापहरणाचे मूळ । तीर्थाचे माहेर ब्रम्ह व्यापक निश्चळ ।
त्रिविधताप शोषुनी रुपी स्वरुपी सुमंगळ ॥१॥
ओंम नमो भगवते राम कृष्ण वासुदेव ॥धृ॥
जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे । तीर्थ ब्रत यम नेम नलगे दैवता धरणे ।
केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ॥२॥
शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग । गुदपीडन कुंडलिनी कलीमल दलभंग ।
उर्ध्व वायुचा स्वेतु तोडोनि करी वो वनभंग । ब्रम्हरंध्री मिसळे परि मुमुक्ष दंग ॥३॥
मनोजय वासना तोडोनि केली बीमोडी । मनपुर नगरी पाहता दुर्गति मोडी ।
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार झोडी । अखंड परमानंद सेऊनि उभवी गुढी ॥४॥
भेदभाव तोडोनिया घेतला प्रेमाचा गरळा । शुध्दनाम श्रीहरीचे निजमुखी लागला चाळा ।
हरिस्मरणाचेनी बळे अंकित केले कलि काळा । एका जनार्दनी अखंड सुख सोहंळा ॥५॥
