तीर्थ व्रत नेम भावें
69.
तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि ।
वायांचि उपाधि करिसी जना ॥१॥
भावबळे आकळे येऱ्हवी नाकळे ।
करतळी आंवळे तैसा हरि ॥२॥
पारियाचा रवा घेता भूमिवरी ।
यत्न परोपरी साधन तैसे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण ।
दिधले संपूर्ण माझे हाती ॥४॥
अर्थ :
तीर्थभ्रमण, व्रत, नेमाची पूजा हे उपाचार भक्तीभावाने केले नाहीत तर वाया जातात त्याने फक्त वाऊगी उपाधी मिळते. तो हरि भावबळाने आकळता होतो. भाव नसेल तर तो कळत नसेल तर भक्तीभाव असेल तर तो तळहातावर घेतल्येला आवळ्या येवढा जवळ असतो. पाऱ्याचे खाली पडलेले थेंब उचलायला प्रचंड यत्न करावे लागतात तसे नामसाधन सोडता इतर साधनानी त्याला प्राप्त करायला सायास पडतात. निवृत्तीनाथांनी मला अभेद निर्गुण रुपाचे दर्शन घडवले असे माऊली सांगतात.
