विमलार्जुनाने केलेली
70.
विमलार्जुनाने केलेली भगवंतस्तुती.
दामोदरा केशवा वामना देवा कृष्णा । परंज्योति नारायणा तुज नमो ॥१॥
विश्वव्यापका जनार्दना वासुदेवा निर्गुणा । अव्यया जगजीवना तुज नमो ॥२॥
अनंत अवतार घेसी भक्तां-साठी । कृपाळु जगजेठी तुज नमो ॥३॥
यज्ञेशा सर्वेशा दयानिधि ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥४॥
धन्य हा दिवस देखिले तुझे पाय । कृपादृष्टी पाहे आह्मांकडे ॥५॥
जोडोनिया हात करिती विनंति । देई तुझी भक्ति जन्मोजन्मी ॥६॥
करूनि नमस्कार हळू-हळू चालती । वेळोवेळा पाहाती कृष्णाकडे ॥७॥
मोडतांचि वक्ष नाद ऐकूनिया येती । धांवोनि पहाती नामा ह्मणे ॥८॥
