भावाचा भोक्ता भक्तास
74.
भावाचा भोक्ता भक्तासी आंगिकार । आरे तु काज कैवारी अनाथाचा ॥
दिनाच्या धावया कैसा तु धावसी । काहि न पाहसी दोष आमचे ॥
आम्ही तव अपराधी । आहा अनंत कोटी । परि तु धुरजेठी आंगिकारिल ॥
बोधला म्हणे जन्मोजन्मी तुझा आखिला । हा देहे ठेविला तुझे पायी ॥
