वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

ज्याचे स्मरणे कैवल्य

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089969 · अभंग क्र. ७०

70.
ज्याचे स्मरणे कैवल्य सांडणे । एका नामे होणे चतुर्भुज ॥१॥
ते रूप वैकुंठ भोगिती गोकुळी । नंदाचिये कुळी बाळकृष्ण ॥२॥
न संपडे ध्यानी लाविता उन्मनी । तो गोपाळाचे कानी सांगे मातु ॥३॥
निवृत्ति अरुवार कृष्णरूपी सेवी । मन ठाणदिवी हृदयामाजी ॥४॥

अर्थ:
ज्या चतुर्भुज रुपाच्या नामाचे स्मरण जरी केले तरी त्या पुढे वैकुंठतील कैवल्याला ही फिकेपण येते. नंदाच्या घरी अवतरलेल्या त्या रुपामध्ये गोकुळाचे जन वैकुंठाचे सुख भोगतात. जे उन्मनी अवस्थेत समाधी लावलेल्यांच्या ध्यानात सापडत नाही ते रुप गोपाळाच्या कानाशी हितगुज करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी त्या रुपाच्या लामणदिवा बनवुन माझ्या हृदयात स्थापन केला व त्या योगे ज्ञानप्रकाश सुख उपभोगत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग