गौळणी गार्हाणे सांग
70.
गौळणी गार्हाणे सांगतो यशोदेसी । दही दुध खाऊनियां पळुनी जातो हृषीकेशी ॥१॥ लाडका हा कान्हा बाई तुझा तुला गोड वाटे । याच्या खोडी किती सांगु महीपत्र सिंधु आटे ॥२॥ मेळवानि गोपाळ घरामध्ये शिरे कान्हा । धरु जाता पळुनि जातो यादवांचा राणा ॥३॥ ऐसे मज याने पिंसे लावियसे सांगु काई । एका जनार्दनी कायावचामने पायी ॥४॥
