वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

गौळणी सांगती गार्‍हा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090380 · अभंग क्र. ६९

69.
गौळणी सांगती गार्‍हाणीं । रात्री आला चक्रपाणी । खाऊनी दही दूध तूप लोणी । फोडिली अवघी विरजणीं ॥१॥ हा गे बाई कोणासी आवरेना । यशोदा बाळ तुइझा कान्हा । कोठवर सांसुद धिंगाणा॥धृ०॥दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात । मुखाशी मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत धरु जाता सांपडेना ॥२॥ तिसरी आली धांउनी । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देउनी । गांठ बाई कोणा सुटेना ॥३॥ मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणी । जातो आम्ही गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेउनी । हे बाई आम्हांसी पहावेना ॥४॥
ऐशीं ऐकता गार्‍हाणीं । यशोदानयनीं आले पाणीं । कृष्ण खोड दे टाकुनी एका जनार्दनी चरणी । प्रेम तया आवरेना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग