यावरी म्हणे सवंगडिया
71.
यावरी म्हणे सवंगडियांसी ।
वत्से फांकलीरे चौपासी ।
वळूनि आणा धांबा त्यासी ।
मग सावकाशी बैसा सुखे ॥१॥
तव ते म्हणती हो वनमाळी ।
आजीचि वळती तुमची पाळी ।
जाऊनिया तूचि सांभाळी ।
आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥
तुंझिया शेषाची हे नवलाई ।
देहभाव आम्हा नुरेचि देहिं ।
जाणे येणे कैचे काई ।
राहिलो ठायी निश्रचळपणे ॥३॥
देव म्हणे हे पावले खुणे ।
गडी माझो झाले शहाणे ।
समाधी सर्वहि ।
काय चतुरानने कीजे यांचे ॥४॥
यांचिये संगती वत्से धाली ।
ब्रम्हसुखाते पावली ।
वियोगवार्ता नेणती भुली ।
निजस्थिति राहिली स्वरुपींची ॥५॥
ऐसे जाणोनिया श्रीपती ।
म्हणे मी जातो आजिचे वळती ।
तुम्ही निश्रचळ रहा वृत्ती ।
कोणी सांगाती फांको नका ॥६॥
निळा म्हणे सांगोनि ऐसे ।
मोहरी पावा घेतला हर्षे ।
वादन करिताचि पूर्व दिशे ।
वत्सेंहि सांडूनि चालिला ॥७॥
