वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

मिळोनि गौळणी । देती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090384 · अभंग क्र. ७३

73.
मिळोनि गौळणी । देती यशोदे गार्‍हाणीं । खोडी करी आमुचे घरा । दारी यशोदे ॥१॥ परां आला आमुचे घरा । दारी निजला होता म्हातारा । घेऊनि ताकाचा ही डेरा । फोडिला सैरा त्यावरीं ॥२॥ दुसरी बोले बाई यशोदे । कांही सांगते तुझिया मुकुंदे । आमचेंघरा येऊनि गोविंदे । नवल केले साजणी ॥३॥ सुन होती माझी गर्भिणी । तीस पुसे चक्रपाणी । कैसी जाहलीली हो गर्भिणी । तव ती हांसु लागली ॥४॥ जवळा बैसला जाऊनी । पोट आहे चांचुपनी । न कळे इश्वराची करणी । तंव ती झिडकावी ॥५॥ ऐशा खोडी नानापरी । किती म्हणोनि सांगु सुंदरी । ऐका जनार्दनी आवरी । आपुलीयां कृष्णांतें ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग