दुरी फांकला हा श्रीह
72.
दुरी फांकला हा श्रीहरी ।
ब्रम्हया जाणवले अंतरी ।
मग धावोनि झडकरी ।
वत्से गोवळे उचलिली ॥१॥
ते तो होती समाधिस्थ ।
ब्रम्हा नेतो हे नेणतीची मात ।
मग ते नेऊनिया समस्त ।
सस्यलोकी बैसविलर ॥२॥
यरवरी येऊनिया श्रीरंग ।
पाहे तव न दिसे संग ।
भले झाले म्हणतुसे मग ।
अवघे आपणचि हो सरला ॥३॥
ब्रम्हा आडवू पाहे मज ।
तरी मी सांडीन त्याची पैज ।
ऐसे म्हणोनिया श्रीराज ।
वैष्णवी माया विस्तारिली ॥४॥
आपण वस्ते आपण गोवळ ।
मोह्या पावे घोंगडी सकळ ।
काठया पवे पाईतणे मेळ ।
झाला ते केवळ एकला एक ॥५॥
लुडे खुडे मुडके कान ।
गोरे सांवळे राजीवनयन ।
बोलिले तोतिरे म्लान वदन ।
दैदिप्यमान तोहि झाला ॥६॥
निळा म्हणे होते तैसे ।
होऊनी ठेला तेवढेंचि जैसे ।
नव्हती पहिले कोणी ऐसे ।
ओळखेंचि नेणती अवलोकिंता ॥७॥
