वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ३. कृष्णचरित्र

यज्ञोपवित सांडिले दु

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089929 · अभंग क्र. ६९

69.
यज्ञोपवित सांडिले दुरी ।
शिखासूत्राची बोहरी ।
करुनिया मोहरी करी ।
कांठी कांवळा गांजिवा ॥१॥
उफराटी पडदणी खेविली टिरी ।
सूक्ष्म शेंडी बोडक्यावरी ।
दृष्टी चोरुनिया माझारी ।
माजी गोवळांच्या नाचतो ॥२॥
येऊनिया कृष्णाजवळा ।
मुख पसरी इच्छूनि कवळा ।
तव हा दावूनिया आणिका गोवळा ।
मुखी भरी स्वानंदे ॥३॥
सर्वांग देखणा श्रीहरी ।
व्यापक सकळाचे अंतरी ।
ब्रम्हा पाडियला फेरी ।
नेदी शितंबोटी आतळो ॥४॥
म्हणे ठकूनिया घेऊ आला ।
कैसेचि अधिकारी तो झाला ।
नव्हे सोंगादिन मी दादुला ।
भंल कोणचा सांगाती ॥५॥
मग म्हणे वांकुल्या दावा यासी ।
न पवे भाग कृत्रिमवेषी ।
तुम्ही सेवारे सावकाशी ।
आजिचिया सुखासी पार नाही ॥६॥
ऐसे जेविले समस्त ।
ब्रम्हा राहिला टोकत ।
निळा म्हणे हा हदगत ।
जाणे सकळा अंतरीचे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग