वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 11. गार्‍हाणीं - अभंग ४८ ते ७७

ऐके ऐके बाई यशोदे ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085424 · अभंग क्र. ७२

72.
ऐके ऐके बाई यशोदे । नवल केले तुझ्या गोविंदे । आमुची मुलें तुडविली पदें । आता यासी बांधीना ॥१॥
आवरीं आवरीं आपुला कान्हां । नाशियल्या आमुच्या सुना । अझुनि नये तुझ्या मना॥तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥ येतो आमुचे घरासी । धमकावितो लेकीसुनासी । कोठे लोणी सांग आम्हांसी । न सांगता वासुरे सोडी बिदीसी ॥३॥ आपण खातो दही दुध लोणीं । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनीं । एका जनर्दनी करी करणी । जातो पळोनि तेथोनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग