वारी पंढरीची तोचि वा
69.
वारी पंढरीची तोचि वारकरी । दया क्षमा बरी वसे तेथे ॥१॥
तोचि माझा जीव प्राणाचाहि प्राण । जीव वोवाळीन तयावरी ॥२॥
आसनी शयनी पंढरीचे ध्यान । वाचे नारायण जप सदा ॥३॥
चोखा म्हणे तोचि माझा हे सांगाती । तयाचे संगती देव जोडे ॥४॥