वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › २, हरिपाठ अभंग ५८ ते ८४

समाधि हरिची सम सुखें

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074947 · अभंग क्र. ७०

70.
समाधि हरिची सम सुखेंवीण ।
न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
एका केशवराजे सकळ सिद्धि ॥२॥
ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि ।
जव त्या परमानंदी मन नाही ॥३॥
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।
हरिचे चिंतन सर्वकाळ ॥४॥

अर्थ :
बुध्दीतील द्वैत गेले की समाधीचे सम व शाश्वत सुख भोगता येते. त्यामुळे जीवाला बुध्दी हे सर्वात मोठे वरदान लाभले आहे व त्या बुध्दीद्वारे तो केशीराज आपलासा करता येतो. ऋध्दी सिध्दी मिळवणे म्हणजे उपाधी मिळवण्यासारखे आहे जो पर्यंत त्या परमानंदात मन रमत नाही तो पर्यंत त्याही काही कामाचा उरत नाहीत. त्या हरिचे चिंतन मी सतत करत असल्याने मला रम्य समाधान लाभले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग