वासुदेव स्मरणे तुटत
72.
वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरणव्याधी । अह सोहं कोह मूळ ह्या सांडी उपाधी ॥१॥
रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा । जन्म जरा तुटे वाचे आठवित सांठवा ॥२॥
चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नादे । तेणे ब्रम्हानंद हृदयी आठवण नांदे ॥३॥
एका जनार्दनी वासुदेव चिंतीता । यम काळदूत पळती नाम ऐंकता ॥४॥
