कैची माया आणि अविद्य
74.
कैची माया आणि अविद्या कल्पना ।
कैची हे वासना पाहतोसी ॥१॥
जगदाकार ब्रह्म अखंडित सर्व ।
पाहे हा अनुभव निश्चयाचा ॥२॥
कैचे मन बुद्धि कैचा रे अभिमान ।
सर्व नारायण अंतर्बाह्य ॥३॥
बहेणि म्हणे अवघे गुणाचे विकार ।
ब्रह्म निर्विकार स्वतःसिद्ध ॥४॥
