एक नाम हरि द्वैतनाम
72.
एक नाम हरि द्वैतनाम दुरी ।
अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥१॥
समबुद्धि घेता समान श्रीहरि ।
शमदमांवरी हरि झाला ॥२॥
सर्वांघटी राम देहांदेही एक ।
सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
मागिलिया जन्मा मुक्त झालो ॥४॥
अर्थ :
त्या एकतत्व नामाची कास धरली की द्वैत राहात नाही व परमात्म्याचे अद्वैतरुप प्राप्त होते. जर समबुध्दीने हे हरिनाम घेतले तर तो शम दम मनोनिग्रह तितिक्षा ह्या गुणाना प्राप्त होतो. ज्या प्रमाणे पाण्याने भरलेले अनेक माठ ठेवले तर त्यात सुर्यबिंब प्रत्येक माठात दिसते त्या प्रमाणे तो सर्व जींवामध्ये दिसतो. नित्यनेमाने हरिनामपाठ केला तर मागिल जन्माचा पापपुण्यापासुन मुक्त होतो असे माऊली म्हणतात.
