मी वासुदेव नामे फोडि
73.
मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो । देखिले पाय आता मागतो दान द्या हो ।
सांवळे रुप माझया मानसी नित्य राहो । पावन संतवृदे सादरे दृष्टि पहा हो ॥१॥
राम कृष्ण वासुदेवा । हरि राम कृष्ण वसुदेवा ॥२॥
सांडोनि सर्व चिंता संतपदी लक्ष लागो । मुक्त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ति जागो ।
भाविक प्रेमळांच्या संगती चित्त लागो ॥३॥
अद्वैतेचि चालो अक्षयी भक्तीयोग । स्वप्नींही मानसाते नातळो द्वेतसंग ।
अद्वयानंद वेधे नावडो अन्यभोग । अक्रियत्व चि वाहो सत्क्रियारुप बोध ॥४॥
पाता विश्व माते निजरुप दाखवी । सत्कथा श्रवण कर्णी पीयूष चाखवी ।
रसने नाम मंत्र सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा म्हणे बा रे घेई ॥५॥
हे दान पावले सद्गुरु शांतिलिंगा । हे दान पावले आत्मया पांडूरंगा ।
हे दान पावले व्यापका अंतरंगा । हे दान पावले एका जनार्दनी दोष जाती भंगा ॥६॥
