गगनाचिये खोपे कडवसा
72.
गगनाचिये खोपे कडवसा लोपे । क्षरोनिया दीपे दृश्यद्रष्टा ॥१॥
तो वोळले गोकुळी वसुदेवकुळी । पूर्णता गोपाळी गोपीरंगी ॥२॥
जिवशिवसीमा नाही जेथे उपमा । हारपे निरोपमा तया माजी ॥३॥
निवृत्ति तत्पर वेदांचा ऊँकार । ऊँतत्सदाकार कृष्णरूपे ॥४॥
अर्थ:
गगनाच्या घरात कवडसा पडण्याच्या जसा योग नसतो तसा दृष्य, द्रष्टा व दृष्यत्व ह्या त्रिपुटीचा लय त्याच्या रुपात होतो. त्याच रुपात ते गोपाळ व गौवळणी रममाण झाले. ते गोकुळात वसुदेवकुळातुन आले. ज्याला जीवशिवाची सिमा नाही कोणतीही उपमा नाही किंबहुना सर्व उपमा त्या रुपाच्या ठिकाणी संपतात निवृत्तिनाथ म्हणतात वेदांची सुरवात असणारा ओंकार., तोच त्या कृष्णरुपाशी तदाकार आहे त्यात मी निमग्न आहे.
