यशोदेसी मायाच्छादन
71.
यशोदेसी मायाच्छादन
समस्ता सांगती लहानाली मुले । नवल देखिले आह्मी आता ॥१॥
वृक्ष मुळींहूनि दोघे निघताती । पायासी लागती कान्होबाच्या ॥२॥
यशोदेचे मनी झालासे विवेक । वैकुंठनायक येथे आला ॥३॥
नामा ह्मणे तिशी घालितसे घाला । अपराध तिजला काय असे ॥४॥
