विषय सेविता गा जन्म
71.
विषय सेविता गा जन्ममरणाचा बाधु । विवेक गुरुवाक्य छेदी भवबंधु ॥१॥
रामकृष्ण वासुदेव हरि ब्रम्हानंदे गळती गा । राम कृष्ण वासुदेव हरि देही विदेही झाला गा ॥२॥
गुरुवाक्य भावबळे निजबोधे पै बुध्दि । तेणे बोधे पाहाता गा अखंड ते समाधी ॥३॥
जनी वनी निरंजनी वासुदेव समान । एका जनार्दनी चित्त चैतन्यघन ॥४॥
