ब्रम्हा विचार करी मन
70.
ब्रम्हा विचार करी मनी ।
ठकडा मोठा हा चक्रपाणी ।
आता येईल आंचवणी ।
तेथे उच्छिष्ट स्वीकारुं ॥१॥
एकांचे सीत उदंड याचे ।
पोट भरणे नाही साचे ।
वचन पूजणे नारदाचे ।
म्हणोनि विरोळा डोही ॥२॥
तव गोवळासी म्हणे श्रीकृष्ण ।
आजिचिया जेवणा अंचवण ।
न घेई तो आम्हा सज्जन ।
जिवलग प्राण निजांचा ॥३॥
गोंवळ म्हणती भलाभला ।
मनींचाचि हेत जाणितला ।
आजीचिया धणी जो जो धला ।
तो तो पावला समाधीसुखा ॥४॥
ऐसे बोलानिया गोंवळ ।
बैसले आत्मस्थितीचि निश्रचळ ।
तव ब्रम्हा डोही करी तळमळ ।
का पा न येतिची आझुनी ॥५॥
मग डोकाउनी बाहेरी पाहे ।
मागुती जळी लीन होये ।
म्हणे मी ब्रम्हा आणि विचंबला ठाय ।
धिग महत्व ते माझे ॥६॥
चोरुनिया वत्से गोंवळ ।
नेंऊ आडवू हा गोपाळ ।
सत्ता बळे घेऊनि कवळ ।
मग ते देऊ याचे या ॥७॥
ऐसे विचारुनिया परमेष्टी ।
राहिला निश्रचळ कातरदृष्टी ।
निळा म्हणे हेही जगजेठी ।
हदगत तयाचे ॥८॥
