शर्करेची गोडी निवयाव
72.
शर्करेची गोडी निवयावया भले । साधू निवडिले सत्संगती ॥१॥
सत्संगे प्रमाण जाणावया हरि । येर ते निर्धारी प्रपंच जात ॥२॥
भानुबिंब पहा निर्मळ निराळे । अलिप्त सकळ साधू तैसे ॥३॥
ज्ञानदेव हरि जपोनी निर्मळ । सदा असे सोज्वळ निवृत्तीसंगे ॥४॥
