प्रकरण :- ॥ काला व ब
74.
प्रकरण :- ॥ काला व बालक्रीडा ॥
कवतुक गोकुळी करी गोपाळांसी । खाय उचिष्टासी दही भात ॥१॥
चोरितसे लोणी घरोघरी त्यांचे । खावोनी तयांचे म्हणे नाही ॥२॥
गौळणी गाऱ्हाणे देता मातेपासी । देखोनी तियेसी हांसतसे ॥३॥
डाई धरोनिया जाय तिचे घरा । करी चाराचुरा खापराचा ॥४॥
सोडोनी गोंधने जाय यमुनेतटी । धांवे धेनुपाठी करी काला ॥५॥
चोखा म्हणे ऐसे दावोनी लाघवआपुली ती माव कळो नेदी ॥६॥
