सद्गुरुवचनें जन्म जे
3807.
सद्गुरुवचनें जन्म जे झाले । मायाजठरीहुनी वेगळे केले । अहंकाराचें गुल्ब तात्काळतोडिलें । वासना समूळ नाळ खोडिलें ॥१॥ जोजो जो परियंदे सहज । रात्रंदिवस नित्य लागलीनिज ॥धृ.॥ पिटिलें जेंगट अनुहात ध्वनी । शांतिक्षमा दया बोलती कामिनी । अपरूपें झाले स्वयेंलक्षणीं । टकमकां पाहे कोहं सोहंपणीं ॥२॥। उपजत पायाळ पै झाला देख । अक्षय ठेवणेलाधले आशेख अविद्या गर्भाचें हारपलें दुःख । नयन पुंजाळले अर्थोन्मिलित ॥३॥ अवलोकनालागींजन आचार्य आला । अशेष अविद्येचा त्यागुकेला । असमाय आनंद आनंदें न्हाला । उसळलाबिंदु पूर्वज समूह मिनला ॥४॥ झाली दृष्टादृष्टीबाणले निरुते । पूर्ण चंद्रक्षीर सागरी भलतें । यापरी आनंद कवळी नभाते । सबराभरीत कवणआवरीते ॥५॥ चिद्रत्नाच्या अंजुळी भरुनी वृत्तीच्याहातीं । स्वानंदाचा मध मुखी घालिती । जनितजन्ममळ निषेध धुती । आ–आप नवल झालीप्रतीती ॥६॥ स्वानुभाव ब्रह्मसुत्र देता पै झाला । अखंड अनुस्फुरत मध्ये बांधला । सभोवता आपवर्गु समूह निमाला । पर परमेष्टी सुखे सुखावला ॥७॥ ज्योतीच्याही ज्योती उजळुनी आरती । ओवाळिलादेखा अखंड दीप्ती । मध्यमा वैखरी परा पश्यन्ती । एकेश्वरे चारी परतोनि गाती ॥८॥ तंतू सूक्ष्मदशेवासना होती । सद् युक्तीच्या वळियेल्या वाती । स्वरूपी लाविला दीपु स्वयंभस्थिती । सहजजागोनियां निरसली सटवीची राती ॥९॥ दहादिन चिलस वासनें केले । इतुकेनि स्पर्शाचे भवफिटलें । आपपरावेनी सकळ शुद्धत्व आले । ब्रह्मरसतेथें पारणे केले ॥१०॥ क्रमुनी अकराही पालखमुहूर्त । स्थानु निर्वाळिला अक्षर अव्यक्त । निरालंबपाळणा लाविला तेथे । अनुभव श्रृंखळा आलियाउचित ॥११॥ माचवे शोभले पुरुषार्थ चारी । निष्काम पाटिया बाणल्या त्यावरी । सबाह्यविणियेली विवेकाची दोरी । त्यामाजी पहुडलासुख निद्रेवरी ॥१२॥ सानु सानु परिये देतु उन्नतउन्मनीं । चिराई तू बा कुंज निरंजनी । माझिये दृष्टीतुज लागे बा झणी । स्वये परतली इडापिडाघेउनी ॥१३॥ निजीनिज सांडुनी अवस्थात्रया । लोण करू गेली साक्षी आणि तूर्या । आपणियाआपण होऊनियां तळिवरिया । सहजी सहजपणेअसणे सहज जया ॥१४॥ मौनामौन पडले शब्दशिराणी । सहज स्थिति येथे धरियेली कानी । पितामहाचा पिता सुभानु वंश वर्णनीं । निजसुखघेतलें एका जनार्दनी ॥१५॥
