वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079763 · अभंग क्र. ३८१६

3816.
(बाळक्रीडा अभंग)
वैकुंठीच्या लोका दुर्लभ हरीजन । तया नारायण समागमे ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंते । जिही चित्तवित्ते समर्पिले ॥२॥
समर्थ ते गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णे केले कौतुक गोकुळी । गोपाळांचे मेळी गाई चारी ॥४॥
गाई चारी मोहोरी पावा वाहे पाठी । धन्य जाळी काठी कांबळीते ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाई पशु ॥६॥
सुख ते अमुप लुटिले सकळी । गोपिका गोपाळी धणीवरी ॥७॥
धणीवरी त्यासी सांगितली मात । ज्याचे जैसे आर्त तयापरी ॥८॥
परी याचे तुम्ही आइका नवल । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥
शिक लावूनिया घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवेंचि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुके । शिव्या देता सुखे हासतुसे ॥११॥
हांसतसे शिव्या देता त्या गौळणी । मरता जपध्यानी न बोले तो ॥१२॥
तो जे जे करि ते दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपे ॥१३॥

अर्थ :
वैकुंठातील लोकांना हरी जनांचे दर्शन फार दुर्लभ आहे कारण भूलोकातील हरी जनांच्या सोबत नेहमी नारायण वास्तव्य करतो त्यामुळे वैकुंठातील लोकांना हरी जनांची भेट व्हावी असे वाटते. ज्या भक्तांनी चित्त आणि वित्त अनंताला समर्पित केले आहेत त्यांचीच संगती हरी नेहमी धरतो. जे समर्थ आहे तेच हरीच्या किर्तीचे पोवाडे गातात मग इतर राव राजे जरी असले आणि ते हरीचे किर्तीचे वर्णन करत नसले तर ते बापुडेच म्हणावे लागतील. बलराम व श्रीकृष्ण भगवंताने गोकुळामध्ये अनेक प्रकारचे कौतुक केले सामान्य गोपाळांसमवेत ते गाई चारत होते. कृष्ण गोकुळामध्ये गाई चारण्यासाठी रानात जायचा त्या

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग