(बाळक्रीडा अभंग)
3844.
(बाळक्रीडा अभंग)
नेदी कळो केल्याविण ते कारण । दाखवी आणून अनुभवा ॥१॥
न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणीतले गडे सांभाळावे ॥२॥
सांभाळ करिता सकळा जिवाचा । गोपाळांसि वाचा म्हणे बरे ॥३॥
बरे विचारुनी करावे कारण । म्हणे नारायण बऱ्या बरे ॥४॥
बरे म्हणउनि तयांकडे पाहे । सांडविला जाय चेंडू तळा ॥५॥
तयासवे उडी घातली अनंते । गोपाळ रडते येती घरा ॥६॥
येता त्यांचा लोकी देखिला कोल्हाळ । सामोरी सकळ आली पुढे ॥७॥
पुसती ते मात तया गोपाळांसी । हरीदुःखे त्यासी न बोलवे ॥८॥
न बोलवे हरी बुडालासे मुखे । कुटितील दुःखे उर माथे ॥९॥
मायबापे तुका म्हणे न देखती । ऐसे दुःख चित्ती गोपाळांच्या ॥१०॥
अर्थ :
कृष्ण् कोणतेही कार्य होण्याअगोदर कोणालाही कळू देत नव्हता प्रत्यक्ष कार्यच अनुभवाला आणून दाखवित होता. कृष्ण् ज्यावेळी कळंबाच्या माथ्यावर गेला त्यावेळी हात चेंडूपर्यंत पोहोचेना असे त्याने गोपाळांना भासविले त्यावेळी गोपाळ कृष्णाला म्हणाले, देवा जरा सांभाळून बरे. सर्व जीवाचा सांभाळ करणा-या देवाला गोपाळ म्हणाले, कृष्णा सांभाळून बरे का त्यावेळी कृष्ण् त्यांना म्हणाला, हो हो सांभाळूनच करतो. कोणतेही कार्य करायचे असेल तर चांगल्या विचाराने करावे असे गोपाळांना कृष्णाला म्हणायचे होते त्यामुळे त्यांच्या ब-याला बरे असे देव म्हणत होता. कृष्णाने गोपाळांना बरे म्हणताच त्याने मुद्दाम चेंडू पाण्याच्या डोहामध्ये पाडला. मग कृष्णाने, त्या अनंताने त्या चेंडूसोबतच डोहामध्ये उडी मारली हे पाहून ते गोपाळ रडतच घरी आले. आल्यानंतर त्या पोरांचा कोलाहल पाहिला त्
