मूळ नाही शेंडा । काय
3818.
मूळ नाही शेंडा । काय म्हणावे त्यागुंडा । वेद अनुवादती प्रचंडा । शास्त्रे भांडती खंडविखंडा ॥१॥ नवलजहालेंबाई नवलजहाले बाई । पाणियाने विस्तवपेटला कोणा सांगावे काई॥ध्रु॥शुन्य होतेंआधी तेथेंजहाले एक । एक पहाता दोनजहालें अलक्ष लक्ष देख ॥२॥ पुरूष नाही स्त्रीनाहीं नाही काही आकार । पहाता पहाणे बुडोनिगेले तेथे कैचा निराकार ॥३॥ ब्रह्मज्ञान घरोघरीकोण तया पुसे । शरण एका जनार्दनी नामगातसे ॥४॥
