वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079709 · अभंग क्र. ३८१९

3819.
(बाळक्रीडा अभंग)
मने हरीरूपी गुंतल्या वासना । उदास या सुना गौळियांच्या ॥१॥
यांच्या भ्रतारांची धरूनिया रूपे । त्यांच्या घरी त्यापे भोग करी ॥२॥
करी कवतुक त्याचे तयापरी । एका दिसे हरी एका लेंक ॥३॥
एक भाव नाही सकळांच्या चित्ती । म्हणऊनि प्रीति तैसे रूप ॥४॥
रूप याचे आहे अवघेचि एक । परि कवतुक दाखविले ॥५॥
लेंकरू न कळे स्थूल की लहान । खेळे नारायण कवतुके ॥६॥
कवतुक केले सोंग बहुरूप । तुका म्हणे बाप जगाचा हा ॥७॥

अर्थ :
गोकुळातील गवळयांच्या सुना मनाने हरीरुप झाल्या होत्या हरीच्या ठिकाणीच त्या असक्त झाल्या होत्या देहाविषयी त्या उदास झाल्या होत्या. देव त्यांच्याच नव-याचे रुपे धारण करुन त्यांचे भोग घेत होता. देव ज्याच्या त्याच्या परीने ज्याच्या त्याच्याशी लीला करत होता एकाला देव भगवंताप्रमाणेच दिसत होता तर एकाला लेकाप्रमाणे दिसत होता. कारण सर्वांच्या चित्तामध्ये एकच भक्तीभाव नव्हता त्यामुळेच देव ज्याच्या त्याच्या आवडीने जसे तसे रुप घेत असे. वस्तुत: पाहिले तर देवाचे एकच रुप आहे परंतु ज्याच्या त्याच्या आवडीने देवाने वेगवेगळे रुप धारण करुन कौतुकच दाखविले आहे. हा स्थूल आहे की मोठा आहे, लेकरु आहे की काय हे कोणालाही कळत नव्हते, अशा प्रकारे नारायण कौतुकाने खेळ खेळत होता. तुकाराम महाराज देवाने अनेक रुपे अनेक सोंगे घेतले खरे परंतु हाच खरा जगाचा बाप आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग