वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 207. पाळणा ३८०४ ते ३८०७

जो जो जो जो रे रघुना

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090355 · अभंग क्र. ३८०६

3806.
जो जो जो जो रे रघुनामा । निजबाळा गुणधामा । योगी आलासे विश्रामा । स्वामीदावीन तुम्हा ॥धृ.॥ जोगी दिसतसे विचित्र । त्याला तीन नेत्र । चर्मावेगळे नाही वस्त्र । म्हणवितोतुझा मित्र ॥१॥ अंगी लावुनियां विभुती । अर्धांगीपार्वती । वृषाभारूढ तो पशुपती । त्रिशूळ डमरूहातीं ॥२॥ आणिक नवल दयाळा । कंठ दिसेनिळा । मस्तकी गंगा वाहे झुळझुळा । नेत्रीअग्निज्वाळा ॥३॥ भस्म चर्चुनी सर्वांगी । वेष्टिलाभुजंगीं । भूते मेळवूनियां बहु जगी । आलासेप्रसंगी ॥४॥ जोगी आलासे अंगणी । तुळशीवृंदावनीं । तुजला देखूनियां नयनी । घालीलोटांगणीं ॥५॥ गोकुळी जन्मले निधान । जगदीशतो जाण । त्याचे चरणी शरण । एका जनार्दन ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग