नाथाच्या घरची उलटी ख
3814.
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥ आंत घागरबाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥ आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणीआढ्या लागले ॥३॥ शेतकऱ्याने शेत पेरिलें । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥ हांडी खादलीभात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥। एका जनार्दनी मार्ग उलटा । जो जाणे तो गुरुचाबेटा ॥६॥
