नीती ३८००
3800.
नीती ३८००
नीति सांगतो ऐका एक । दास सभेचासेवक । मन टाळू नका एक । कोणी एक॥ध्रु॥सांडावरून जाऊ नये । लांच खाऊ नये । चोहट्यात राहुंनये । कोणी एक ॥१॥ अक्रीत घेऊनये । इमान सोडूं नये । बैमान होऊ नये । कोणीएक ॥२॥ सञ्जनाशीं विटूंनये । नीचासवें वाटूनये । तस्कराशीं पुसू नये । कोणी एक ॥३॥ भक्तिमार्गखंडू नये । कुभांड्यासी तंडु नये । खळासंगे भांडुनये । कोणी एक ॥४॥ सत्पुरूषाशीं छळु नये । शिवेचा गुंडा ढाळू नये । केला नेम टाळु नये । कोणीएक ॥५॥ सद्गुरूसेवा सोडूं नये । कुळधर्मासीमोडू नये । पापद्रव्य जोडू नये । कोणी एक ॥६॥ संपत्ती आलीया माजू नये । अभिमाने फुगु नये । सभा देखोनी लाजू नये । कोणी एक ॥७॥ असत्यवाद करू नये । खोटा संग धरू नये । मोचकाशीमैत्री करू नये । कोणी एक ॥८॥ भलते भरी पडूंनये । अनाचार करू नये । कपट मनी धरूं नये । कोणी एक ॥९॥ जन्मा अलिया स्वभावे । कांहीसार्थक करावे । ऐसे मनी विचारावें । कोणीएक ॥१०॥ एका जनार्दनी भावे । संतचरणी लीनव्हावें । सदा हरिनाम उच्चारावे कोणी एक ॥११॥
