कहाणी ३८०१
3801.
कहाणी ३८०१
तुम्हा आम्ही सांगतो कहाणी । सोळाबारा मिळोनी गडणी । कहाणी सांगती बैसोनीवनीं । जो ऐके तोपरपुरूषधनी ॥१॥ चित्त द्यावे आमुच्याबोला । सांडा वाया गलबला । विसरूनी प्रपंचाच्यामुळा । शब्दांचा लागोंद्या चाळा ॥२॥ एक अघटितवर्तलें । एक नारीस पांच पती देखिले । एका पुरूषागरूवार केले । साठ पुत्र जन्मले बळे ॥३॥ एकाब्राह्मणे कुत्रे खादले । ग्रामजोशा प्रायश्चित दिले । - एका नारीने कवसाल केले । बापा भावांशी लग्नलाविलें ॥४॥ आईहोऊनी करवली । लेक वांटितसेहळदुली । पती विव्हळम्हणोनीजाकळी आमुच्याकहाणीची हे मुळी ॥५॥ कहाणी सांगे शिवशक्ति । तेणे एका जनार्दनी तृप्ती । संत महंत आनंदती । अभाविका न कळे गती ॥६॥
