वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079818 · अभंग क्र. ३८१३

3813.
(बाळक्रीडा अभंग)
शिळा स्फटिकाची न पालटे भेदे । दाउनिया छंदे जैसी तैसी ॥१॥
जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावे ॥२॥
फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥३॥
मायबापा सोडविले बंदीहुनि । चाणूर मर्दुनी कौंसादिक ॥४॥
अदिक नाही देणे अरिमित्रा एक । पूतना कंटक मुक्त केली ॥५॥
मुक्त केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥६॥
पाप कोठे राहे हरी आठविता । भक्ती द्वेषे चिंता जैसा तैसा ॥७॥
साक्षी तयापाशी पूर्वीलकर्माच्या । बांधला सेवेच्या ऋणी देव ॥८॥
देव भोळा धावे भक्ता पाठोवाठी । उच्चारिता कंठी मागेमागे ॥९॥
मानाचा कंटाळा तुका म्हणे त्यासी । धावे तो घरासी भाविकांच्या ॥१०॥

अर्थ :
स्फटिक मणी ज्या रंगावर आपण ठेवू त्या रंगा प्रमाणे स्फटिक मण्याचा रंग बदलतो परंतु त्याचे मूळ रुप काही बदलत नाही. अगदी त्याप्रमाणे देव गोकुळामध्ये जसा भक्ताचा भक्तिभाव असेल त्याप्रमाणे क्षणाक्षणाला आपले स्वरुप बदलित होता त्यांच्या इच्छा पूर्ण करत होता परंतु तिथे आपल्या मूळ स्थितीतच होता. गोपाळ गवळणी मायबाप सर्वाच्याच इच्छा पूर्ण करण्यासाठीच देवाने अवतार धारण करुन पृथ्वीवर आला होता. चाणूर, कंस इत्यादी दुष्टांचा वध करुन कृष्णाने मायबापाला बंदीखान्यातून सोडविले होते. एवढेच नाही देवाने कंसाला व चाणूराला वधलेच नाही तर त्यांना मुक्तही केले, बालकंटक पूतनेला देखील त्याने मुक्ती दिली कारण देवाला कोणत्याही भावनेने भजले मग तो शत्रू असो की मित्र असो कोणीही देवाला कोणत्याही कारणास्तव भजले तर देव त्यांना मुक्तीच देतो. एवढेच नाही तर ज

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग