वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(बाळक्रीडा अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079683 · अभंग क्र. ३८३४

3834.
(बाळक्रीडा अभंग)
संयोग सकळा असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥
गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिले ॥धृपद॥
उतरूनि हाते धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥२॥
दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥३॥
लहान हा थोर जीवजंतु भूते । आपण दैवते झाला देवी ॥४॥
देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हा थोर देव हरी ॥५॥
हरी तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तीसाठी ॥६॥

अर्थ :
गोपाळांना गोविंदाचा वियोग जरी झाला तरी त्याचे चिंतन करुन गोविंदाचा संयोग गोपाळांना घडायचा परंतू तिकडे गोविंदाला त्याच्या भक्तांवाचून करमत नव्हते त्यामुळे तो उदास होत असे. गाई चारुन एकदा की कृष्ण घरी आला की मग यशोदा म्हणत असे की माझ पोर अतिशय गुणवान आहे असे म्हणून त्याच्यावरुन लिंबलोण यशोदा उतरवून टाकीत असे. कृष्णाची हनुवटी धरुन यशोदा त्याची दृष्ट काढीत असे. जो विश्वाचा जनक आहे त्या श्रीकृष्णाला भक्तांच्या सुखाचा फार हव्यास होता आणि अशा या कृष्णाची दृष्ट यशोदा काढत होती. जेवढी काही लहान भूते देव आहेत देवी आहेत त्या सर्व कृष्णाच्याच रुप होत्या. महिषासूरमर्दिनी, देव, मुंजोबा, खेचर, भूत, पिशाच्च सर्व लहान मोठे देव देवी हा स्वत: हरीच झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व जगात एक हरीच व्यापलेला आहे तरी देखील भक्तांसाठी हा देव गोकुळामधे लहान बाळ झाला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग