जागर ३८२९
3829.
जागर ३८२९
हरिजागरणी दिवस आनंदें सौरस । गावया उल्हास वैष्णवांसी ॥१॥ गाता पै नाचतांतयां जाला पै बोधु । त्यामाजीं गोविंदुक्रीडतसे ॥२॥ चला चला रे भाई हरिजागरा वेगी । वैष्णव हे रंगी नाचताती ॥३॥ स्वानंदे लवलाह्याउभवोनी सात्त्विका बाह्या । अलिंगु कान्हयाअष्टभावीं ॥४॥ दुजेपणावीणखेंव पडिलेंसें मिठी । सांगणे पुसणेगोष्टी हरपली ॥५॥ यापरी वैष्णवरंगीकरिताती आल्हाद । उसळला आनंदसाठवेना ॥६॥ एकाएकी हो मीनला जनार्दन । तेणेंसुखें मना उमजुंनाहीं ॥७॥
