वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 224. किल्ला ३८३६

किल्ला ३८३६

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086859 · अभंग क्र. ३८३६

3836.
किल्ला ३८३६

धुम धुम बार उडविला । ऐसा गलीमकोण आला । त्याने किल्ल्यासी वेढा दिला । तोआज ऐकिला ॥१॥ राजा पुसे प्रधानाला । का रेकशाचा आवाज आला । वेढा फौजेचा पडला । कसा वांचवीन जीवित्वाला ॥२॥ फौजेचा आकारपाहिला । तोफा जडल्या रे किल्ल्याला । या रयतीतफितूर झाला । माझा संगती मिळाला त्याला ॥३॥ आता कैसा राहिला किल्ला । या किल्ल्याचा आधारकेला । मुजुमदारानेच फितुर केला । आता आश्रयकोण जाणिला ॥४॥ कोण वांचवील माझ्यापाणाला । प्रधान विसंगीत होऊनि पडला । मातकऱ्याचा पहिला अबुला । विश्वासाचा हुजऱ्यामेला ॥५॥ कोण सांभाळील या किल्ल्याला । किल्ल्याचा पहिलाच पाया पडला । खबर नाहींपायदळाला । तोफेचा म्होरेस्वार गेला ॥६॥ निदानींआश्रा नाही किल्ल्याला । तोंडपुरचा दरवाजा पडला । धक्का लागला गांडियेसी । त्याने मार्गच अवघामोडिला । अंतकाळ आला राजाला ॥७॥ तोफालावून चाही कोण । चाही बुरुज गेले पडून । धुगधुगीत राजाचें मन । मग कशास हो हैराण ॥८॥ यम चोपदार नेती बांधोन । सहस्र अंगालावोन । तप्त अर्गळा मुखी घालून । तप्त भूमीवरचालवून ॥९॥ सुळी दिला राजा जाण । केलेंकर्मे झाडा देऊन । गेले तसेंच उसने देणे । राज्याच्या अंती नर्क जाण ॥१०॥ ऐसे बोलवितीप्रजाजन । शेवटी राजा गेला निर्गुण । सावध म्हणेजनार्दन । धोका झाला ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग