मोती ३७९८
3798.
मोती ३७९८
धूर्ताचे मोती जळी हरपलैं सखोल मोठेपाणी । चला पाहूंसहाचार अठरा जणी ॥धृ.॥ प्रपंचधोंडा मृगजल पाणी आपटीत होते चोळी । विसरलेंसुख घसरले तळी । सखे मायेने मोती दडविलेंभवसिंधुच्या जळीं । होतीगढेभ्रांती बहीण जवळी॥तिनेच मजला गोष्टी विनविल्या चित्त गेलेभुलोनी ॥१॥ आठ जणींनी मोती दडविले वरठेवीला धोंडा । अशाच पहाती अवघ्या रांडा । बारासोळा तळी उरल्या त्यांनी धरिला दांडा ।ठाऊकसत्राविला झेंडात्यामध्ये मी गर्क झाले एकलीचवाई वनी ॥२॥ चवघीजणी सत्वर मिळोनी डोळीअंजन घाला । माझ्या मोत्याला प्रेमेंन्याहाळा । ज्ञानबोभाची लावुनी दिवटी बरवी वात उजळा । माझेमोत्याला सर्वकळा । प्रपंच पडदा फाडून गुरुपदींलावा में ठिकाणी ॥३॥ चौघीजणी मोक्ष नाईकामजला धरा हाती । उतरा सागर पैल पंथी । यामोत्याच्या साठी मजला जाणे आहे सती । म्हणूनमी येते काकुळती ।एका जनार्दनी चिन्मय मोती न गुरू वांचून ॥४॥
