(बाळक्रीडा अभंग)
3845.
(बाळक्रीडा अभंग)
गोपाळा उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा झाली त्यांची ॥१॥
झाले काय ऐसे न कळे कोणासी । म्हणती तुम्हापासी देव होता ॥२॥
देवासवे दुःख न पवते ऐसे । काही अनारिसे दिसे आजी ॥३॥
आजि दिसे हरी फांकला यांपाशी । म्हणउनि ऐशी परि झाली ॥४॥
जाणविल्याविण कैसे कळे त्यांसि । शाहाणे तयांसि कळो आले ॥५॥
कळो आले तीही स्फुंद शांत केला । ठायीचाच त्याला थोडा होता ॥६॥
होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणे ॥७॥
सांगे आता हरी तुम्हा आम्हा नाही । बुडाला तो डोही यमुनेच्या ॥८॥
यासी अवकाश नव्हेचि पुसता । जालिया अनंता कोण परि ॥९॥
परि त्या दुःखाची काय सांगो आता । तुका म्हणे माता लोकपाळा ॥१०॥
अर्थ :
कृष्ण डोहात बुडाला त्यामुळे गोपाळांना दुखाचा इतका उबाळा आला होता की, त्यांना तो आवरतच नव्हता दु:खाने त्यांची वाचा कुंठीतच झाली होती. नेमके झाले काय हे कोणालाच काही कळेना कृष्ण कोठेही दिसेना नंतर काही वेळाने अचानकच सर्वजण विचारु लागले, अरे तुमच्याबरोबर देव होता ना तो कुठे आहे ? या गोपाळांबरोबर जर देव असता तर यांना दु:ख झाले नसते देव असला की, यांना कधीही दु:ख होत नाही परंतु आज हे दु:खी दिसतात म्हणजे आज काहीतरी विपरीतच झालेले दिसते. पुढे गोपाळ असे विचार करु लागले की, आज यांच्यापासून देव कुठेतरी बाजूला गेला आहे त्यामुळेच या गोपाळांची अशी अवस्था झाली आहे. काही सांगितल्यावाचून कसे काय समजणार आहे परंतु त्यामध्ये काही शहाणे गोपाळ होते त्यांना ते लक्षात आले. त्यामध्ये काही शहाण्या गोपाळांनी रडत असलेल्या गोपाळांना शांत केले मूळत:च ज्या
