वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 202. थट्टा ३७९९

थट्टा ३७९९

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087954 · अभंग क्र. ३७९९

3799.
थट्टा ३७९९

अशी ही थट्टा । भल्याभल्यासीलाविला बट्टा ॥धृ.॥ ब्रह्मदेव त्रैलोक्यालाशोधी । थट्टेनें हरविली बुध्दी । केली नारदाची नारदी । अशीही थट्टा ॥१॥ थट्टा दुर्योधनाने केली । पांचाळीसभेमाजीआणिली गदाघायेमांडी फोडीली अशीही थट्टा ॥२॥ थट्टा गेली शंभोपासी । कलंकलाविला चंद्राशीं । भगें पाडीली इंद्रासी । बरी नव्हेथट्टा ॥३॥ थट्टेने मेला दुर्योधन । भस्मासुर गेलाभरम होऊन । वालीही मुकला आपुला प्राण । अशीहीथट्टा ॥४॥ थट्टा रावणाने केली । नगरी सोन्याचीबुडविली । थट्टा ज्यासी त्यास भोवली । बरे नव्हेथट्टा ॥५॥ अरण्यांत होता भृगु ऋषी । थट्टा गेलीत्याचेपाशीं । भुलवुनी आणिला अयोध्येसी । बरीनव्हे थट्टा ॥६॥ विराटाचा मेहुणा । नाम तयाचेंकीचक जाणा । त्याने घेतले बहुतांचे प्राणा । बरीनव्हे थट्टा ॥७॥ थट्टे पासून सुटलें चौघेजण । शुकभीष्म आणि हनुमान । चौथा कार्तिकस्वामीजाण । त्याला नाही बट्टा ॥८॥ एका जनार्दनी म्हणेसर्वांला । थट्टेला भिऊनी तुम्ही चाला । नाही तरनेईल नरककुंडाला । अशी ही थट्टा ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग