वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 216. भूत ३८२५ ते ३८२७

भूत ३८२५ ते ३८२७

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085480 · अभंग क्र. ३८२५

3825.
भूत ३८२५ ते ३८२७

भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपडकरूं गत काई ॥१॥ सूप चाटूचे केले देवाया भूतानें धरिली केशीं ॥२॥ लिंबू नारळ कोलाउतारा । त्या भूतानें धरिला थारा ॥३॥ भूत लागलेनारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥ भूत लागलेध्रुव बाळाला । उभा अरण्यांत ठेला ॥५॥ एकाजनार्दनीं भूत । सर्वांठायीं सदोदित ॥६॥

3826.
पिता सांगे पुत्रासी । बाळा नकोजाऊं पंढरीसी । तेथे आहे थोर विवशी । ती तुजगिळील समुळेंसी ॥१॥ भूत दारुण खेचर मोठे । ते नांदे भीमातिरी वाळवंटी । तेणे झडपिले मोठेमोठे । ते बा नये घरदार वाटे ॥२॥ अंबरीषरुक्मांगदा । मयूरध्वजाची थोर आपदा । हनुमंताझाली थोर बाधा । तोचि नाचे समाधी सदा ॥३॥ ।भूत लागले प्रल्हादासी । तेणे मारविलें आपुल । जनकासी । भूत लागले त्या बळीसी । नेउनाघातियेला पाताळासी ॥४॥ भूत लागले नारदमुनी । तो हिंडे त्रिभुवनी । देह भ्रांति सांडोनी । गेला । भूतामाजी मिळोनी ॥५॥ धुरू लेंकरू कोडिसवाणे । त्याचे खुंटले येणे जाणे । तोही झडपिला भनेयेणें । आणिक थोर थोर घेतले प्राणे ॥६॥ भनेझडपणी केली बहुता । सिद्ध ऋषी मुनी समस्तां॥तेही न धरिती मागुता । अवघी भूतेंच होती । सर्वथा ॥७॥ येणे मारिले असंख्यात । सहस्रार्जुनथोर बळिवंत । हिरण्यकश्यप असुरनाथ । रावणकुंभकर्ण समस्त ॥८॥ कंसासुर आणि पूतना॥शिशुपाळ वक्रदंत राणा । मागधादी काळयवना । कौरवांची सकल सेना ॥९॥ नाही राहत एकेस्थानीं । सद्यां होते गोवर्धनीं । ते बा पुंडलिकेंमंत्रोनी । उभे केले येथे आणोनी ॥१०॥ चंद्रभागापुष्पावती । सायंकाळी पद्मतीर्थी । करी रानामधींवस्ती । नको धरू त्याची संगती ॥११॥ ऐकसांगतों तुज विचारू । भूते झडपिल्या तुज कायकरूं । एका जनार्दनी निर्धारू । तेणे केला भूतांचाअंगिकारू ॥१२॥

3827.
दादा वरले माळी दिसते । दोनी डोळे । वटारितें । ते बा बहुत भेडसावितें । जवळी गेल्या । गिळू पहातें ॥१॥ ते बा बहु दु:खदायक । तेणेंशिणविलेंसिद्ध साधका तेंबा भयानक । वेगी गोवींतिन्ही लोक ॥२॥ तेणे मुंगीचा मार्ग घेतिला । मुळीहुनी शेंडा चढला । शेंड्यापासुनी खालताआला । तो तेथोनि निसटोनी गेला ॥३॥ ते बाअचोज चोजवेना । जवळी आहे परी दिसेना । ते बाझोंबिन्नले कळेना । झाडितां परी झडेना ॥४॥ तनुमनुधने शरण । एकनिष्ठ जयाचे मन । एकाजनार्दनी शरण । त्यासी सहजीची समाधान ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग