धांवा ३८३० ते ३८३१
3830.
धांवा ३८३० ते ३८३१
द्रौणी अस्त्रा हाती । उत्तरा पीडितांसती । गर्भी राखिला परिक्षीती । तैसा पावेंश्रीपती ॥१॥ वेगी ऐका श्रीहरि । धांव पाव मुरारी । चक्र घेऊनियां करी । भवभय निवारी ॥२॥ इंद्रवरूषे शिळाधारी । गोकुळ पीडितां भारी । राखिलेंगोवर्धनधारी । तैसा पावे झडकरी ॥३॥ दुर्वासद्वादशी छळ आला अंबऋषी । चक्रं पळवोनीन्यासी । दहा गर्भवास सोशिले ॥४॥ सभेतवस्त्रहरण । पतिव्रता मरण । द्रौपदी लज्जा रक्षण । अंबर जाला श्रीकृष्ण ॥५॥ पांडव लक्ष्या जोहरीधडाग्नी पोळत भारी । साही जणी चिंतीता हरि । काढीलें विवरद्वारी ॥६॥ देखोनी गुरू तो गत । रणांगणी भ्याला पार्थ । त्यासी सांगुनी गीतार्थ । संग्रामी केला तुवा मुक्त ॥७॥ एका जनार्दनी दत्त । सहाय्य जाला सतत । मोहे भवभय जेथा तेथ केलानित्यमुक्त ॥८॥
